मुख्यमंत्र्यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
विधानसभेचे वारे काही दिवसात वाहू लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पंढरपूर दौऱ्यात अनेकांना खुश करत राजकीय वारी केली. आषाढी एकादशीच्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात उतरून काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांची भेट घेतली. यानंतर पंढरपुरात विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या बाजार समिती मधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती .
एकादशीला विठुरायाच्या पूजेनंतर सकाळी पहिल्यांदा काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या कल्याणराव काळे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी चहापान घेतले .काळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी जाऊन फराळाचा आस्वाद घेतला. असे करत मुख्यमंत्रीनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असे म्हणण्यात काहीच हरकत नाही.
