Maharashtra GovShivSena-Congress-NCP

एक्सिस बँकेतून पोलिसांची खाती काढणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढवण्याचा सपाटा लावणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना धडा शिकवण्याच्या प्रयत्नात त्या काम करत असलेल्या एक्सिस बँकेतली पोलिसांची खाती काढून घेण्याची तयारी सरकारने चालविल्याचे कळते.

अमृता फडणवीस २००३ सालापासून एक्सिस बँकेत कार्यरत आहेत. सध्या त्या या बँकेत उपाध्यक्ष (कॉर्पोरेट हेड – पश्चिम भारत) या पदावर आहेत. राज्य पोलीस दलातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांचे वेतन फडणवीस सरकारच्या काळात एक्सिस बँकेतून होत होते. यानिमित्त या बँकेत वर्षाला ११ हजार कोटी रूपये जमा व्हायचे. फडणवीस सरकारने पोलिसांची खाती एक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मोठी टीका झाली होती. यावर, स्पष्टीकरण देताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केवळ माझी पत्नी एक्सिस बँकेत आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला नसल्याचे म्हटले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अशा खात्यांसाठी ज्या बँकांची निवड केली होती त्यात एक्सिस बँकेचाही समावेश होता. केवळ आमचे सरकार आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यावर या बँकेतली पोलिसांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेकडे वळविण्याचे घाटत असून मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button