MonsoonTravel

पूर्व द्रुतगती महामार्गावर ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

४ ते ५ दिवस सातत्याने पडत असणाऱ्या पावसाने काल पासून विश्रांती घेतली. पावसामुळे घरात राहिलेले नागरिक आज कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे आणि मध्य रेल्वेही मंद गतीने धावत असल्याने मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत मुलुंड ते विक्रोळी दरम्यान सुमारे ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाल्याने अनेकांनी कार, टॅक्सी अथवा बसने जाणे पसंत केले. अशात अनेक रस्त्यांची अवस्था खराब आहे. अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. यामुळे मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले. याच कारणामुळे मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button