Maharashtra Govठाणेविधानसभाशिक्षण

सहकार विभागाच्या परिक्षांमध्येही घोळ, एमपीएससीद्वारे परीक्षा घ्याव्यात

आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत मागणी

ठाणे: आरोग्य विभागातील भरतीतील परिक्षेतील घोळ चर्चेत असतानाच, काल गुरुवारी झालेल्या सहकार विभागाच्या लिपिकपदाच्या परिक्षेतील गोंधळ उघड झाला आहे. काळ्या यादीतील कंपन्यांकडे भरतीप्रक्रियेचे काम सोपविल्यामुळे गोंधळ होत असून, तरुण बेरोजगार हवालदिल झाला आहेत. तरी या परिक्षांची प्रक्रिया रद्द करून आरोग्य विभागाप्रमाणेच सहकार विभागाची परिक्षाही एमपीएससी द्वारे घेण्यात यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत केली.

महाविकास आघाडीकडून राज्यात विविध खात्यातील भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, संबंधित प्रक्रिया राबविण्याचे काम महाआयटीने काळ्या यादीतील कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे पुण्याच्या बेरोजगाराला नागपूरचे सेंटर, तर नागपूरच्या तरुणाला पुण्याचे सेंटर, प्रश्नपत्रिकांचा फुटलेला गठ्ठा, एका बेंचवर दोन विद्यार्थी आदी गैरप्रकार आरोग्य विभागाच्या परिक्षेत उघड झाले. त्यापाठोपाठ काल सहकार विभागातील लिपिकपदाच्या परिक्षेतील गोंधळही उघड झाला.

आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे काल `पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’ द्वारे लक्ष वेधले. महाआयटी विभागाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी काळ्या यादीतील कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी राबविलेली भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा घ्यावात, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button