मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांपुढे अमित ठाकरे यांनी डोकेच टेकले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज (मंगळवारी) मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत मुंबईच्या समस्यांबाबत अमित ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरानंतर त्यांनी त्यांच्या समोर डोके टेकल्याचे पहायला मिळाले.
या बैठकीदरम्यान, अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या महाव्यस्थापकांसमोर प्रवाशांच्या समस्या सांगितल्या. तसेच रेल्वेमध्ये महिला सुरक्षित नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावे आणि सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
रेल्वे सेवांबाबत वेळापत्रकाची नियमितता पाळावी, रेल्वे रद्द करण्याचे प्रमाण कमी करावे, गर्दीच्या स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवाव्यात, महिला प्रवाशांकरिता विशेष गाड्यांचे नियोजन करावे, प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत, रेल्वे स्थानके आणि पादचारी पुलांवर गर्दीचे नियंत्रण आणि सुचना देण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावे, अशा काही सुचना मनसेने निवेदनाद्वारेही केल्या आहेत.