Ratnagiri

नितेश राणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महामार्ग उपउभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नितेश राणे यांनी ४ जुलै रोजी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातल्याची घटना घडली असता पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करून त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. ही मुदत संपल्यामुळे नितेश यांना आज पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी नितेश यांना जामीन मिळेल, अशी राणे समर्थकांची अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button