
गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 17,730 गणेशमुर्तींचे गौरींसह महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल 8420 गणेश मुर्तींचे व 591 गौरीचे विसर्जन झाले तर महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 564 गणेश मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, सहावा दिवस आणि 10व्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारे गाव आदी ठिकाणी एकूण 11 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिटबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या 5 दिवसांच्या गणपतीचे वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी पाचव्या दिवशी 15,671 घरगुती गणेशमुर्ती, 1318 गौरी, 177 सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच 564 स्विकृत मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.
मासुंदा येथील कृत्रीम तलावामध्ये घरगुती 1401 श्री गणेशमुर्तींचे व 191 गौरींचे विसर्जन करण्यात आले. आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी 1120 घरगुती गणेश मुर्तींचे व 120 गौरीचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात 1134 घरगुती गणेश मुर्तींचे व 42 गौरींचे विसर्जन करण्यात आले. आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये 435 गणेश मुर्तींचे व 49 गौरी, रेवाळे कृत्रिम तलाव येथे 532 घरगुती गणेश मुर्ती, 9 सार्वजिनक गणेश मुर्ती व 23 गौरी, मुल्लाबाग येथे 696 घरगुती गणेश मुर्ती, 17 सार्वजिनक गणेश मुर्ती व 25 गौरी, खिड़काळी तलाव येथे 318 घरगुती गणेश मुर्ती, 4 सार्वजिनक गणेश मुर्ती व 18 गौरी, शंकर मंदीर तलाव येथे 251 घरगुती गणेश मुर्ती, 9 सार्वजिनक गणेश मुर्ती व 19 गौरी, उपवन तलाव येथे 2250 घरगुती गणेश मुर्ती, 44 सार्वजिनक गणेश मुर्ती व 104 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
पारसिक नगर येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट 1 व 2 येथे 1191 घरगुती गणेश मुर्ती, 46 सार्वजिनक गणेश मुर्ती व 164 गौरींचे विसर्जन करण्यात आले. मिटबंदर घाट येथे 760 घरगुती गणेश मुर्ती, 7 सार्वजिनक गणेश मुर्ती व 175 गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट 1 व 2 येथे 3171 घरगुती गणेश मुर्ती, 235 गौरी, कोलशेत घाट 1 व 2 येथे 1287 घरगुती गणेश मुर्ती, 26 सार्वजनिक गणेश मुर्ती व 98 गौरी तसेच दिवा विसर्जन घाट येथे 1125 घरगुती गणेश मुर्ती, 15 सार्वजिनक गणेश मुर्ती व 55 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये स्वयंसेवक, महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या सहकार्याबद्दल महापौर आणि महापालिका आयुक्तांनी सर्वांचे आभार मानले.


