जेव्हा रोमँटिक गाण्यांची यादी तयार केली जाते, तेव्हा कोहरा या चित्रपटाचा सदाहरित आणि सर्वात आवडते हे ‘ये नयन डरे डरे’ गाणे चुकत नाही. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सारेगम संगीताच्या सहकार्याने पार्श्वगायिका अमृता फडणवीस यांनी सुंदर गाण्याचे गाणे गायले आहे.
या गाण्याबाबत आपले मत व्यक्त करताना अमृता फडणवीस या अस म्हणतात की “या गाण्याला दशकांहून अधिक काळ झाला आहे, परंतु हे गाणे अद्याप ताजे आहे. आजपर्यंतच्या रोमँटिक गाण्यांच्या यादीत हे कोणालाही चुकणार नाही.” मूळ गाणे हेमंत कुमार यांनी मध्ये कोहरा या चित्रपटासाठी गायले होते. कैफी आझमी यांनी हे गीत लिहिले होते. अमृता फडणवीस या अत्यंत सक्रियपणे चित्रपट, सामाजिक घटनांवरती गाणी गात आहेत.
Presenting for u only 🌹with lots of 💕"Ye Nayan Dare Dare'-magical mesmerising melodious masterpiece of @saregamaglobal ! All through this romantic song, I enjoyed being my own valentine & believe me it was freaking amazing! Watch 👉https://t.co/p342uSKcPJ #valentinesday2021 pic.twitter.com/C3Zd6mih5G
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2021
अमृता फडणवीस यांनी या बाबतीत सांगताना त्यांनी असे ट्वीट टाकले की, सादर करीत आहोत आहोत “ये नयन डेरे डेरे’ ! या रोमँटिक गाण्याद्वारे, मी माझ्या स्वतःच्या व्हॅलेंटाईन असल्याचा आनंद घेतला आणि हा अनुभव खूपच सुंदर होता”


