Policeमुंबई

मुंबई पोलिसांचे “Operation All Out” : ३९ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या !

मुंबई: शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ हे अभियान राबविले. पोलिसांनी शहरातील सुमारे २५९ ठिकाणी कारवाई (कोम्बिंग) करून ३९ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत अमली पदार्थ कायद्यान्वये ८८ जणांना अटक करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करून त्यांच्याजवळील शस्त्र जप्त केली. हे संपूर्ण शहरभरात तिसर्‍या वेळी ऑपरेशन घेण्यात आले आहे आणि प्रत्येक मोठ्या कार्यक्रमापूर्वी अशी मोहीम राबविली जाईल हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे.

रविवारी रात्री ११ ते दुपारी २ या वेळेत शहरभरातील २५९ ठिकाणी मोहिमेचे कामकाज चालविण्यात आले. या दरम्यान एकूण १,२७८ जणांवर गुन्हेगारी नोंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट अन्वये काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर इतर ३७ जणांवर अनधिकृत शस्त्रास्त्र असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू आणि जुगाराच्या ४२ ठिकाणांवर छापा मारून पोलिसांनी ७१ जणांना अटक केली. शहरात जागोजागी बसणाऱ्या १३५ अनधिकृत फेरीवाल्यांवरही या वेळी कारवाई केली गेली. तसेच ५० भिकारी पकडले.
एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, २९ ठिकाणांची तपासणी केली गेली, विविध गुन्ह्यांतील १,७८७८ जणांची चौकशी केली गेली, आरोपींना पकडले गेले, ८८ जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

” ऑपरेशन दरम्यान, आम्ही ११,८८१ वाहने तपासण्यात यशस्वी झालो आणि मालकांना विविध कायद्यांनुसार दंड ठोठावला गेला, आणि ३११ जणांना नशेत गाडी चालवल्याप्रकरणी अटक केली गेली. ११ लॉज, हॉटेल्स आणि आम्ही शोध घेतलेल्या अशा आस्थापनांपैकी अवैध कृत्य करणार्यांवर आम्ही कारवाई केली. ” अशी त्यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button