Maharashtra Gov

सगळ्यांसाठी मुंबई लोकल लवकर सुरु करण्याचा सरकारचा विचार!

मुंबई : ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल ट्रेन सर्वांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या ८ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असं ट्वीट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी ट्वीट केलं आहे.

एका प्रवाशाने ट्वीट करत म्हटलं होतं की, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे.”

राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ट्विटरवर एका प्रवाशाने याबाबत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. लवकरच लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन करण्यासाठी सरकार कामाला लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार मिशन बिगेनच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन प्रवाशाची सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता राज्य सरकार सर्वांसाठी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लोकल सगळ्यांसाठी लवकर सुरु करावी यासाठी सर्व स्तरांतून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकलसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, लोकल सर्वांसाठी कधी सुरु करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच वडेट्टीवारांनी प्रवाशाच्या ट्वीटला दिलेलं उत्तर हे लोकल लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button