ग्लेनमार्क औषधाची किंमत गरिबांना परवडणारी नाही
मुंबई : जून महिन्यात ग्लेनमार्क कंपनीने कोविड-19 वर औषध काढल्याचा दावा केला होता. मात्र, हे औषध मुंबईतील ग्लेनमार्क कंपनीेने अवाजवी दरात विकल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ग्लेनमार्कचे हे औषध गरीबांना परवडण्यासारखे नसल्याचीह टीका होत आहे.
भारतीय औषध नियामक कंपनीने मुंबईतील फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क यांना औषधांच्या किंती व विक्रीसंदर्भात विचारणा केली आहे. ग्लेनमार्क कंपनीने कोविड -19वर औषध काढले. मात्र ते, फॅबीफ्लू औषध हे काही विशिष्ट वर्गातील लोकांच्या हिताचे नाही, अशा किंमतीत विकले असल्याचा आरोप केला जात आहे. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया मधील ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कोविडच्या उपचारासाठी जून मध्ये औषध मंजूर केले होते.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, डॉ. व्ही.जी. सोमानी यांनी मुंबईस्थित कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या कार्यालयाला एका खासदाराकडून प्राप्त झालेल्या तक्रारीप्रमाणे फॅबीफ्लू (फेव्पीरावीर) यांच्यावरील उपचारांचा खर्च सुमारे 12,500 रुपये असेल तर, “ग्लेनमार्कने प्रस्तावित केलेली ही किंमत निश्चितच गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या हितासाठी नाही.”
तसेच, त्या खासदाराने तक्रारीत म्हटले की, ग्लेनमार्कने असा दावा केला आहे की हे औषध उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या सह-रूग्णांना प्रभावी आहे, परंतु प्रत्यक्षात, प्रोटोकॉलनुसार , ही चाचणी कॉमर्बिड अवस्थेतील फाबीफ्लूचे आकलन करण्यासाठी बनविली गेली नव्हते. , “17 जुलै रोजीच्या पत्रात या अटींशी संबंधित कोणताही वैद्यकीयदृष्ट्या पुरेसा डेटा उपलब्ध नाही, असे डीसीजीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे.

