Environmentइतरपुणेमुंबई
मुंबईत गारवा, मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव !
मुंबई: मुंबईमध्ये समुद्र असल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव हा फारसा कमीच येतो. काहीच दिवसांपूर्वी नाशिक आणि पुणे येथे या महिन्यातील सगळ्यात कमी तापमान हे नोंदवण्यात आले. राज्यातील सर्वाधिक किमान तापमान हे १० अंश सेल्सिअस इतके नाशिक येथे नोंदवण्यात आले. तर जळगाव मध्ये १० अंश सेल्सिअस इतके खाली उतरले. जालना, पुणे, आणि मालेगाव येथेही तापमानात घट झाली आहे.
उत्तर भारतासह काश्मीर मध्ये सुद्धा थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात विदर्भातही किमान तापमानातं घट झाली आहे. येत्या २ दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने दर्शवली आहे. महाराष्ट्रातील तापमान घट पुढीलप्रमाणे
नाशिक – १०
जळगाव-१०. ४
जालना- ११
पुणे- १०. ८
मालेगाव-११. २
बारामती – ११. ३
परभणी-१२. ४
महाबळेश्वर-१३. ६
औरंगाबाद-१२.



