राजकारण
आणीबाणी विरोधकांना पंतप्रधानांकडून सलामी
आणीबाणीला ४४ वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणीबाणीवर ट्विटरच्या आधारे टीकास्त्र सोडले मोदींनी एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली ज्या मार्फत आणीबाणीच्या स्मृती जागवत आणीबाणीच्या विरोधकांना सलाम केला. त्याच बरोबर अमित शहा यांनी ‘राजकीय हितासाठीच लोकशाहीची हत्या करण्यात आली होती,’ अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५मध्ये आणीबाणी घोषणा केली होती. त्याला आज ४४ वर्षे पूर्ण झाली.
