Maharashtra Gov

पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई पोलिसांच्या पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सहा नवीन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या शासकीय घरांबरोबरच त्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पोलिसांच्या स्वतःच्या घरांसाठी आखण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान देऊन मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असे म्हंटले

पोलिसांच्या मुलींना शिक्षणाच्या मदतीसाठी सुरू केलेली सुकन्या योजना, आरोग्यासाठीची हेल्थिझम कार्ड, मुलांच्या शिक्षणासाठीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म टॉपर्स ॲप्स, संगणक प्रशिक्षण वर्ग, पोलिसांच्या वैयक्तिक खटल्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला, वाहतूक पोलिसांना गॉगल्स वाटप या योजनांच्या शुभारंभाच्या वेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button