तरुणांना रिसर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकर्या मिळण्याची शक्यता ! भरतीची प्रक्रिया सुरु
मुंबई: आर.बी.आय मध्ये आता ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. आर.बी.आय सध्या जुनिअर इंजिनियर , ग्रेड बी ऑफिसर आणि सिकीर्यूटी गार्ड पदांवर भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. तसेच १० फेब्रुवारीला आणखी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) मॅनेजर (टेक-सिव्हील) असिस्टंट मॅनेजर (राजाभाषा) आणि असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिकीर्यूटी) या पदांवर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
इच्छुक उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार १० मार्च २०२१ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.
एकूण २९ पदे आहेत.
लीगल ऑफिसर (ग्रेड बी) ११ पदे
मॅनेजर (टेक सिव्हील) १ पद
असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) १२ पदे
असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिकीर्यूटी) ५ पदे
अर्ज करण्यासाठी पहिले करियर सेक्शन वर जाऊन २३ फेब्रुवारी या तारखेसह उपलब्ध झालेल्या लिंकवर क्लिक करावे नंतर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन क्रमांक आणि युझर नेम व पासवर्ड सह ॲप्लिकेशन सबमिट करावे. कोरोना काळात बर्याच तरुणांची नोकरी गेल्याने त्यांना ही आलेली सुवर्णसंधी आहे.

