पुणे

आषाढी वारीला सुरुवात

पुणे – आषाढी एकादशी जवळ आली असून आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आज सोमवार (२४ जून) रोजी देहूतून पंढरपूरला जाण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या मंगळवारी (२५ जून) आळंदीहुन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पंढरपुरसाठी निघणार आहे. या पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३४ वे वर्ष आहे. हा श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी ठिकठिकाणहून भाविक येतात. सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बुधवारपर्यंत बदल करण्यात आला असून पालखी देहूफाटा आळंदी चौकातून जाईपर्यंत पुणे – आळंदी रस्ता(मॅक्झिन चौक) बंद असून पुणे – दिघी मॅक्झिन चौक-मोशी चाकण या पर्यायी मार्गाचा वापर तसेच मोशी – देहूफाटा रस्ता या रस्त्याऐवजी मोशी – चाकण – शिक्रापूर किंवा मोशी – भोसरी – मॅक्झिन चौक – दिघी या रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात येणार असून महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी परिसरात मोबाइल आणि फायबर टॉयलेटची सोय करण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button