Indian RailwayRailways
भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती
मुंबई : दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती होणार असून यासाठी १ लाख ४० हजार पदे भरावयाची आहेत. एनटीपीसी, पॅरा मेडिकल स्टाफ, मिनिस्ट्रीयल आयसोलेटड कॅटेगरी तसेच आरआरसी ग्रुप डी या पदांसाठी सुवर्णसंधी आहे.
पदे अशी –
- NTPC कनिष्ठ लिपिकसह टायपिस्टसह टायपिस्ट/ लेखा लिपिकसह टायपिस्ट / ट्रेनी लिपिक / गुड्स गार्ड / स्टेशन मास्टर
- Para Medical Staff – स्टाफ नर्स / आरोग्य मलेरिया निरीक्षक / फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक
- Ministrials Isolated Category – स्टेनोग्राफर / मुख्य कायदा संरक्षक / ज्युनिअर ट्रान्सलेटर (३५ हजार २०८ पदे)
- RRC-Group D ट्रक मेंटेनर/ गेटमॅन/ पॉइंट्समॅन / हेल्पर्स (१ लाख ३ हजार ७६९ पदे)
परीक्षा पद्धत - रेल्वे बोर्डाद्वारे वरील पदांसाठी ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल.
अट –
एका उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करता येईल.
परीक्षेची तारीख –
- NTPC – २८ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१
- RRC-Group D – एप्रिल २०२१ ते जून २०२१
- Ministrials Isolated Category – १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२०
अधिक पाहावे माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in