Featuredलाइफस्टाइललाईफस्टाईललेख

नोकरी शोधताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा !

सद्य परिस्थितीत नोकरी शोधणे हे फार कठीण झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी शोधणे म्हणजे एक डोकेदुखीच झाली आहे. याहून जास्त कठीण झालं आहे ते म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणे. स्वतःवर शंका न करता आत्मविश्वास कसा आणणार ? या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया, एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ४५ टक्के लोकांना नोकरीसाठी मुलखात देणे आणि दुसर्यांना भेटणे खूप कठीण जाते. कारण स्वःतामध्ये आत्मविश्वास नसतो आणि एका प्रकारचा न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड नंतर वाढत जाऊन आपल्या आत्मविश्वासाला कमी करतो आणि एक अपयशी असल्याची भावना मनात घर करून राहते. यालाच कमी करण्यासाठी काही उपाय बघू.

१. ईंटरव्हियू ला जाताना स्वतःला एक ‘पेप टॉक’ द्या

हो पेप टॉक ! म्हणजेच स्वतःला एक प्रकारचे समजावणे याने होते असे की तुम्ही तुमच्यासाठी पुरेसे आहात, तुम्ही हे करू शकता या प्रकारच्या वाक्यांनी तुम्ही स्वतःला समजावून शकता. याने असे होते तुम्हाला एक प्रकारची हुशारी येते आणि तुम्ही थोडेसे का होईना आत्मविश्वासी होता. मग तुम्हाला भीती वाटत नाही . इंटरव्हियू ला जाताना तुम्ही स्वतःला एक पेप टॉक द्या जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास येईल.

२. तुम्हाला तुम्ही पुढील १० वर्षात कुठे हवे असाल याचे मनात चित्र तयार करा!

आपले विचार आणि त्यांचा गुंता यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या भावी करियर ला नीट समजू शकत नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या नोकरीतून नक्की काय हवय हे आपल्याला कळत नाही आणि जेव्हा कुठल्याही नोकरीसाठी आपण अर्ज करतो त्यावेळी होते असे की भविष्याचे चित्र मनात नीट नसल्याने आपण प्रभावीपणे समोरच्याला सांगू शकत नाही किंवा तेवढा प्रभाव पाडू शकत नाही.

३. स्वःताला एकटे समजू नका

एक लक्षात ठेवा तुम्ही या जगात एकटे नाही आणि असा न्यूनगंड हा बऱ्याच लोकांमध्ये असतो. त्यामुळे ही साशंकता बऱ्याच लोकांमध्ये असते. आपण यात एकटे नाही असे मनात आणल्यावर सुद्धा तुम्हाला बरे वाटेल.

४. एक प्रश्न स्वतःला विचार जास्तीत जास्त वाईट काय होईल?

हा प्रश्न म्हणजे सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे. जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा विचार करणे. हा विचार केल्यावर तुमची मनातील भीती ही निघून जाईल आणि एका प्रकारची धिटाई मनात येईल. असा शेवटचा विचार केला बऱ्याच गोष्टीची भीती वाटणे निघून जाते. नोकरी शोधताना आणि तसेच ती मिळाल्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो त्यावेळीही हा प्रश्न स्वतः ला विचार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button