मुंबईलाईफस्टाईल

चर्चगेट स्थानकावर फुलला विठ्ठल भक्तीचा मळा

आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. लहानपणापासून गावाकडे आषाढी एकादशीची पूजा करणारे आणि पंढरपूरच्या वारीचे महत्व जाणून उपवास करणारे जेव्हा मुंबईत येतात, तेव्हाही आपल्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. मुंबईतील चर्चगेट स्थानकावरही आज विठ्ठल भक्तीचा मळा फुललेला दिसला.

मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर अंगात सदरा, धोतर घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंद लावून मुंबईकर भजनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून दिंडी घेऊन चर्चगेट रेल्वे स्थानकावर आले. स्थानकावरील विठ्ठल भक्ताचा मेळा पाहून चाकरमान्यांची पाऊलेही थबकली. तर, मुंबईच्या डबेवाल्यांचाही उत्फुर्त सहभाग यामध्ये दिसला. विशेष म्हणजे रेल्वेचे अधिकारीही या सोहळ्यात दंग झाले. तसेच वारकरी अन् माऊलींसाठी चहा आणि फराळाचा अल्पोपहारही काही स्थानिक संघटनांकडून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button