कोल्हापूरसिंधुदुर्ग (Sindhudurg)
८ वर्षाच्या दुर्वांकने घडवला विश्वविक्रम !
सिंधूदुर्ग: कोल्हापुरातील शांतीनिकेतन या शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुरड्याने चक्क जागतिक विक्रम केला. दुर्वांक गुरुदत्त गावडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने चक्क २ मिनिटे ३७ सेकंदात २०० विषाणूंची यादी तयार केली. ह्याचा हा विश्वविक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवला गेला आहे.
दुर्वांकाचे वडील हे खासगी वाहनाचे चालक असून त्याची आई ही कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात परिचारिका आहे.त्यांचे वडील गुरुदत्त यांच्या प्रोत्साहनाने त्याने हे करण्यास हे करायची तयारी केली. विज्ञान विषयातील तज्ञ डॉक्टर संजीवनी माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले व हा विश्वक्रम केला.
अवघ्या वयाच्या ८ व्या वर्षी हे केल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते दुर्वांकचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.
अवघ्या वयाच्या ८ व्या वर्षी हे केल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते दुर्वांकचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.