राष्ट्रविरोधी संघटनेवर देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर पालिकेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत जरी केलेल्या आदेशावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे . फडणवीस यांनी घेतलेल्या आक्षेपावरून वाद निर्माण झाला आहे .
मुंबई महानगर पालिकेने १८ मे एक आदेश जरी केला आहे .ज्या मुस्लिम व्यक्तीचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला त्यांचे मृतदेह पीएफआयकडे सोपविण्यात यावे. मुंबई मनपाचा हा निर्णय धक्कादायक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले .
फडणवीस यांनी मंगळवारी यासंदर्भात ट्विट केले होते की , मला आश्चर्य वाटले, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सारख्या संघटनेला मुंबई महापालिकेने कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला आहे. ही संघटना देशविरोधी आणि समाजविरोधी कार्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे आपल्याला मान्य आहे का? जर आपल्याला हे मान्य नसेल तर कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.


