टीकांना सकारात्मकतेने घ्या !
आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला त्यातुन दोन प्रकारचे फिडबॅक’ हे मिळतात. फीडबॅक म्हणजेच अभिप्राय . अभिप्राय हे चांगले असू शकतात नाहीतर त्या टीका असू शकतात. या टीका कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला कमी करतात आणि त्यांना सकारात्मकतेने पहाण्याऐवजी आपण त्यांना नकारात्मक दृष्टींनी पाहू लागतो आणि आपल्यात एका प्रकारचा न्यूनगंड तयार होतो.
न्यूनगंडामुळे आपल्याला नवीन काहीतरी करण्याची हिम्मत जाऊन भीती निर्माण होते. आपण या टीकांना खूप नाकारात्मकतेने बघतो त्यांना गरज आहे सकारात्मक दृष्टीने बघण्याची ! टीका सकारात्मक पद्धतीने घेणे जरा अवघडच आहे पण अशक्य नाही. So Take your Criticism Positively !
१. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे थांबवा
जेव्हा आपल्यावर कोणी टीका करत असेल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीवर सांगत असेल त्यांचे मत देत असेल तर त्यावर लगेच रागवून प्रतिक्रिया देऊ नका. जरा वेळ थांबा आणि विचार करा की ही व्यक्ती खरंच चांगल सांगत आहे की आपल्या की मला नावं ठेवत आहे ह्यात फरक बघा आणि त्याप्रमाणे बोला. जर ती व्यक्ती चांगल सांगत असेल तर त्याला लक्षात ठेवून स्वतःच्या कामात सुधारणा आणा.
२. असा विचार करा कसाही का असेना तुमच्या कामाचा प्रतिसादात तुम्हाला मिळत आहे
हो, हे जरी ऐकायला विचित्र असले तरी एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचा एकप्रकारे प्रतिसातदच मिळत आहे. त्यामुळे त्याला चांगल्या दृष्टीने बघा. काहीच न कळण्यापेक्षा काहीतरी कळलेले हे केव्हाही चांगले. तुमच्या सहकाऱ्यांकडून, बॉसकडून , किंवा गुरूंकडून जर टीका मिळत असतील तर एक समजा एका प्रकारे हा प्रतिसातदच आहे.
३. प्रश्न विचार जेणेकरून तुम्हाला तुमच्यावर झालेल्या टीका का झाल्या हे कळेल.
प्रश्न विचारणे हा मनुष्य स्वभाव आहे. या स्वभावाचा पुरेपूर वापर करून घ्या. एखादी व्यक्ती जर तुमच्यावर टीका करत असेल तर तिला प्रश्न विचारा की या टिकाकरणामागे तिचे कारण काय आहे? कुठल्या गोष्टीवरून (कामाच्या) ती तुमच्यावर टीका करतेय? तिला नक्की काय नाही आवडल आणि त्या मागच कारण काय? हे प्रश्न त्या टीकाकारणाऱ्या व्यक्तीस विचारा. असा केल्याने ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला टीकेच्या मागचे कारण सांगेल.
४. धन्यवाद माना
हो एक लक्षात ठेवा जे लोक तुमच्यावर टीका करतात ते लोक तुमचे काम आणि त्यावर होणाऱ्या सुधारणांवर लक्ष ठेऊन असतात. त्यांचा हेतू हा सरळ असतो की तुमचे काम आणखी चांगले पाहिजे. प्रत्येक वेळीस चांगले बोलून सुधारणा होणार नाहीत तर टीका ऐकूनच माणूस सुधारतो. त्यामुळे जे टीका करतात त्यांचा धन्यवाद माना . आणि आणखी जोमाने तुमचे काम करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास सुरुवात करा.