सांगली महापालिकेकडून 50 वर्षावरील नागरिकांची वैद्यकीय तपासणी
सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील 50 वर्षाच्यावरच्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी पथक मंगळवारी रवाना झाली. येत्या दहा दिवसात या पथकाकडून वॉर्डनिहाय 50 वर्षावरील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.
महापौर गीता सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ही वैद्यकीय तपासणी पथकांची वाहने रवाना करण्यात आली. या करिता 20 प्रभागा 20 पथके तयार करण्यात आली आहेत. एक समन्वयक अधिकारी, सहायक अधिकारी , स्टाफ नर्स, आशा वर्कर यांचा समावेश आहे. रक्तदाब, ताप , श्वासोश्वास प्रमाण यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर 50 वर्षावरील नागरिक आणि अति जोखमीचे लोक ज्यांना रक्तदाब, मधुमेह, दमा, मूत्रपिंडाचे आजार याबरोबरच ताप, सर्दी, खोकला, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास सबधितांची माहिती दररोज सायंकाळी 5 पर्यंत पथकाकडून दिली जाईल. ही माहिती प्रभाग वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवली जाईल आणि वैद्यकीय पथक त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी बरोबर कोविड 19 ची चाचणी करणार आहेत.
