राजकारण

21 जुलैला होणार भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांची लगबग सुरु झालेली असतानाच 21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात ही बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे. तसेच या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील हजेरी लावतील अशी शक्यता आहे. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात 220 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. आता मात्र या बैठकीत मुख्यमंत्री कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button