ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन – हाजी अरफात शेख
मुंबई-नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्यावतीने देण्यात आलेली मोटारसायकल ही फक्त मोटारसायकल नसून बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारी आणि समाजात मान उंचावून जगण्याचा मार्ग दाखवणारी मोटारसायकल असल्याचे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केले.

भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या वतीने गरजू , बेरोजगार , सुशिक्षित युवकांना दुचाकी वाटपाचा कार्यक्रम कुर्ला स्थित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या उद्धवगड कार्यालयात संपन्न झाला.यावेळी वाहतुकदारांचे नेते व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या हस्ते बेरोजगार सुशिक्षित युवकांना चावी देण्यात आली.
संघटनेच्या वतीने या युवकांना स्वीगी,झोमेटो मध्ये नौकरी देखील लावण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी सांगितले.सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन नवभारतीय शिववाहतुक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष फैझल अमीन यांनी केले होते.यावेळी नवभारतीय शिववाहतुक संघटनेचे सरचिटणीस विनय मोरे यांच्या समवेत वाहतूक व भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
