Kokan
महामार्गाच्या मुद्द्यावर निषेध करणे योग्य आहे परंतु हिंसा हा त्याचा योग्य मार्ग नाही – नारायण राणे
‘मुंबई – गोवा महामार्गाच्या मुद्द्यावर निषेध करणे योग्य आहे परंतु हिंसा हा त्याचा योग्य मार्ग नाही’ असे म्हणत नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या वागणुकीवर टीका केली. ‘सरकारी अधिकाऱ्याबरोबर केलेली वागणूक अतिशय चुकीची असुन मी या घटनेला समर्थन देत नाही.’ असे म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी उपअभियंत्याला धक्काबुक्की करत पुलावरच बांधल्याचा धक्कादायक प्रकार घडला या घटनेवर नारायण राणे प्रतिक्रिया देत असताना त्यांचे असमर्थ त्यांनी दर्शवले.
Image Source : ANI