या तेलामुळे होतात त्वचा विकार दूर
या तेलाचे नाव आहे रोजहीप सीड ओईल. होय, हे गुलाबांच्या बियांचे तेल आहे. गुलाब स्वतः त्वचेसाठी खूप गुणकारी असते म्हणूनच तर आपण त्याच्या पाकळ्यांच पाणी बनवून त्याला चेहर्यासाठी, उटण्यामध्ये आणि केसांसाठी सुद्धा वापरतो. रोजहीप चे तेल हे रोसा कानिना नावाच्या गुलाबापासून बनवले जाते. हा गुलाबांचा प्रकार हा साधारणतः साऊथ अमेरिकतेल्या चिले मध्ये उगवतो. हे तेल हे गुलाबांच्या बियांपासून तयार केले असते. या तेलात मोठ्या प्रमाणात असिड्स आणि विटामिन्स असतात. तुमच्या त्वचेला हे तेल कसे उपायकारक ठरते हे जाणून घेऊया
१. या तेलामुळे त्वचा मउ राहण्यास मदत होते
त्वचा सुकी पडण्याचे पहिले कारण म्हणजे त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणे. हिवाळ्यात, उन्हाळ्यात कमी पाण्यामुळे त्वचा शुष्क होऊन निस्तेज बनते. रोजहीप च्या तेलात लिनोलेनिक आणि लिनोलेईक नावाचे असिड्स असतात जे शुष्क त्वचेला मऊ करण्यास मदत करतात.
२. या तेलामुळे त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.
त्वचेवरील मृतपेशीमुळे त्वचा हि काळी पडते. हे तेल त्वचेवरील काळेपणा काढून टाकण्यास मदत करते. जेणेकरून नवीन त्वचा बनण्यास व त्वचा उजळण्यास मदत करते. यात विटामिन सी आणि विटामिन ए असते जे नवीन त्वचा बनण्यास मदत होते. तसेच सुर्व्याच्या क्रीनानामुळे काळी पडणारी त्वचा सुद्द्धा उजळते.
३. त्वचेवरील मुरुमे आणि डाग घालवते
वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लाऊन त्वचेवर डाग आणि मुरुमे यायला लागतात. तसेच वयोमानानुसार चेर्यावर फाईन लाईन्स यायला सुरुवात होते. स्त्रिया फेशियल करतात यामुळे त्वचेवर डाग येतात रोजहीप चे तेल हे त्वचेवरील डाग घालवण्यास मदत करते. डोळयाभोवती येणारी काळी वर्तुळे सुद्धा ह्याने जातात.
हे तेल हे बाजारात तसेच online सुद्धा मिळते. कुठल्याही मेडिकल मध्ये ते तेल मिळू शकते. जास्तीत जास्त या तेलाचा फायदा करून घेण्यासाठी हे रात्री चेहर्याला २ ते ३ थेंब लाऊन झोपा. व दुसऱ्यादिवशी याचा परिणाम तुम्हाला दसेल.