कोरोना अपडेट्स : राज्यात आज ३,६७० नवीन रुग्ण !
मुंबई: राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा ३ टप्पा हा मार्च पासून सुरूच होणार आहे तरीही अजून कोरोनाबाधित रुग्णामध्ये वाढ ही होतचं आहे. राज्यात आज दिवसभरातून कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजून वाढून आली आहे.
आज ३,६७० नवीन रुग्ण आढळले असून २, ४२२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात १९ लाख ७२ हजार ४७५ रुग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठण्यात आले आहे.
सर्वानिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये असे सांगितले की, राज्यात १९ लाख ७२ हजार ४७५ रुग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठण्यात आले आहे. राज्यात गेले काही दिवस करोना रुग्णसंख्या घटली होती. त्यामुळे बंधने अधिक शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु या आठवडय़ात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १ मार्च पासून कोरोना लसीकरणाचा ३रा टप्पा हा लवकरच सुरु होणार असल्याने सामान्यांनाही लवकर लस मिळेल अशी आशा आहे.