औरंगाबाद (Auragabad)

कोरोनाबाधितांचे खासगी हॉस्पिटलने घेतलेले बिल सरकारने परत करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन : प्रवीण दरेकर

औरंगबाद : कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्यमधून खर्च करणार, असे सरकार सांगत असले तरी राज्यातल्या खासगी दवाखान्यांनी रुग्णांची लूट केली आहे. बाधितांचे खासगी हॉस्पिटलने घेतलेले पैसे राज्य सरकारने परत करावेत. जर हे पैसे परत केले नाही तर भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी दिला. कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर ते औरंगाबाद येथे बोलत होते.

दरेकर यांनी घाटी तसेच कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. या वेळी भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह हरिभाऊ बागडे उपस्थित होते. मुंबईत डॉक्टरांना २ लाख रुपये महिना दिला जातो. त्यामुळे औरंगाबादमध्येही कंत्राटी डॉक्टर पदभरतीत २ लाख रुपये महिना द्यावा. तरच औरंगाबादमध्ये कोरोनासाठी डॉक्टर उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

आयसीएमआरबाबत केंद्रासोबत चर्चा करू
दोन दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आयसीएमआरच्या सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णाच्या चाचण्या कमी केल्याचे सांगितले. त्यावर दरेकर यांना विचारले असता याबाबत आपणही केंद्राकडे आयसीएमआरच्या सूचनात बदल करण्याबाबत पाठपुरावा करू, अशी माहिती दरेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button