Maharashtra GovRatnagiri

शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात प्रवीण दरेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

रत्नागिरी: शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र दिले आहे.

भाजपचे नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी मिरजोळे गावातील शीळ धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत नगरपरिषदेला निवेदन दिले होते. हाच विषय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावून धरला असून त्यासंदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठविले आहे. शीळ धरणातून रत्नागिरी नगरपरिषद हद्दीत पाणी घेताना, नळपाणी योजनेचे पाईप मिरजोळे गावातून टाकण्यात आले आहेत. सदरचे काम घाईघाईत पूर्ण करण्यात आले असल्यामुळे पाईप गेलेल्या भागातून रस्ता खचला आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था वाईट होणार असून येथे अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबरोबर शासनाच्या निधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button