महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर संस्थेच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप कार्पाम संपन्न

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर ठाणे-पालघर या संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोफत शालेय साहित्य वितरणाचा कार्पाम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मिडोज, मानपाडा, ठाणे (प.) येथे संपन्न झाला. यावेळी बालशिक्षण सुधार गृहातील 500 विद्यार्थ्यांना आणि ठाणे, पालघर जिह्यातील 3500 अदिवासी, मागासवर्गीय, बालमजुर, भटक्या-विमुक्त जातीजमाती व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, चप्पल-बुट, नोटबुक, बॅग इ. शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्पामाचे उद्घाटन आणि दिपप्रजोलन सिविल जज बेगलुर, नांदेड कोर्टचे सुधिर बर्डे, चित्रपट पार्श्व गायक आनंद शिंदे यांनी केले. यावेळी चित्रपट अभिनेत्री किशोरी विज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्पामात प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते रायगड संपर्प प्रमुख अनंत तरे, ठाणे महापौर मिनाक्षी शिंदे, सभापती माजीवडा, मानपाडा प्रभाग समिती ठाणे सिध्दु ओवळेकर, पत्रकार कैलाश म्हापदी, ऑल इंडिया बंजारा समाज अध्यक्ष शंकर पवार, शिवसेना विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, हॉटेल रॉयल गार्डन रिसॉर्टचे मंगेश ठाकूर, भुमी एकर बोल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे भुषण मेहता, हॉटेल शंग्रीला रिसॉर्ट ऍण्ड वॉटरपार्पचे हरिष भाई, मे.न्यु कामत टोबको चे प्रो. शोभा ताई कामत, जय मल्हार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे प्रो. उमेश पाटील, मे. न्यु शिमला डेअरीचे प्रो. दिलीप भाई परमार उपस्थित होते.
या कार्पामाचे आयोजक म्हणून गुलाब तरे, बुधाजी पाटोळे, रविंद्र मस्तान, कलावती गायकवाड, कांता पवार यांनी काम पाहिले.

