Indian RailwayRailwaysTravel

IRCTC ची नवी वेबसाईट लाँच; तिकीट बुकिंग होणार अधिक वेगवान, Tatkal प्रवाशांना मोठा दिलासा

भारतीय रेल्वे मंत्रालयाने IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) च्या वेबसाइचे नवे व्हर्जन लाँच करण्याची घोषणा केली आहे. नव्या वेबसाईटमुळे तिकीट बुकिंगची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, विशेषतः Tatkal तिकीट बुकिंगदरम्यान प्रवाशांना जलद आणि सुरळीत सेवा मिळणार आहे. यासोबतच नवीन इंटरफेस, पसंतीची सीट निवड, भाडे तुलना सुविधा आणि बहुभाषिक सेवा यांसारखे अनेक नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

तिकीट बुकिंगची क्षमता पाचपटपेक्षा अधिक वाढणार

नवीन प्रणालीमुळे IRCTC ची तिकीट बुकिंग क्षमता प्रति मिनिट 32 हजारांवरून तब्बल 1.5 लाखांहून अधिक तिकिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी लॉगिन करून बुकिंग करू शकतील.

🚨 The Ministry of Railways is launching a new version of the IRCTC website.

1. Ticket booking capacity increased from 32,000 to 1.5 lakh+ tickets per minute.

2. PNR & train enquiry capacity increased from 4 lakh to 40 lakh+ enquiries per minute.

3. Faster page loading and… pic.twitter.com/Ah2VbS3RK1— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 13, 2026

PNR आणि ट्रेन चौकशी होणार अधिक वेगवान

PNR स्टेटस आणि ट्रेन चौकशीची क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आता प्रति मिनिट 40 लाखांहून अधिक चौकशा हाताळण्याची क्षमता प्रणालीमध्ये असेल. यामुळे वेबसाइट स्लो होण्याची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

Tatkal बुकिंगसाठी विशेष सुधारणा

Tatkal तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन वेबसाईटमध्ये पेज लोडिंग अधिक वेगवान करण्यात आले असून, अनावश्यक CAPTCHA, पॉप-अप आणि चमकदार जाहिराती हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

पसंतीची सीट आणि भाडे तुलना सुविधा

प्रवाशांना आता तिकीट बुकिंग करताना आवडती सीट किंवा बर्थ निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच Fare Calendar सुविधेमुळे वेगवेगळ्या तारखांवरील भाड्यांची तुलना करून स्वस्त पर्याय निवडता येणार आहे.

बहुभाषिक सेवा आणि विशेष प्रवाशांसाठी सुविधा

नवीन प्लॅटफॉर्मवर बहुभाषिक इंटरफेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी आवश्यक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.

RailOne अ‍ॅपवरही मिळणार सर्व सुविधा

IRCTC वेबसाईटवरील सर्व सुधारित फीचर्स RailOne अ‍ॅपवरही उपलब्ध असतील. नवीन आरक्षण प्रणाली पूर्वीपेक्षा 10 पट अधिक ट्रॅफिक हाताळू शकेल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

Related Articles

Back to top button