बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC

एचआयव्हीग्रस्त विधवा महिलांना दर महिन्याला पालिका देणार १ हजार रुपये

एचआयव्ही बाधित विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील एचआयव्हीबाधित विधवा महिलांना मासिक एक हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. पालिकेकडून मिळणारे पैसे थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. साधारण दोन ते साडेतीन हजार महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुंबईत राहत असणाऱ्या आणि एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या निधनानंतर पत्नीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. एड्समुळे मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या नावाची नोंदणी एसआरटी केंद्रात केलेली असावी. पतीच्या मृत्यूचा दाखला अथवा महापालिकेच्या शासकीय मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे त्यासाठी आवश्यक असणार आहे.

या योजनेनुसार दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे ईसीएसद्वारे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र, तिच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच विधवेच्या मृत्यूनंतर याचा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महिला देखील एचआयव्ही संक्रमित असावी तसेच नियमित एसआरटी औषधोपचार घेणारी असावी, असा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button