पुणे

पुण्यातील तापमानाचा काटा खाली !

पुणे: बुधवारी पुण्यातील तापमानाचा काटा खाली आला असून पुण्यातील गारठा वाढण्याची शक्यता आहे. इंडिया मेट्रो लोजिकल डीपार्टमेंट च्या सांगण्यानुसार १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद या बुधवारी सकाळी केली गेली . आणखी तीन ते चार दिवस गारठा कायम राहणार असल्याच अंदाज पुणे वेधशाळेत कडून देण्यात आला आहे.

यावर्षी पुणे शहरातच नव्हे तर विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात थंडी नाही. पुण्यात ६ डिसेंबरला आणि २२ डिसेंबरला नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. हे दोन दिवस सोडता फारशी थंडी जाणवली नाही. मध्य महाराष्ट्र आणि पुणे आणि आजूबाजूंच्या शहरातील तापमान घसरण्याची जानेवारी महिन्यात शक्यता आहे. यावर्षी थंडीत पाउस आणि उष्ण वार्यांमुळे हवामान थोडे वेगळे होते.

पुणे शहर आणि परिसर सध्या दर संध्याकाळी आकाश अंशात ढगाळ होत आहे. काही भागात धुके पडण्याची शक्यता आहे. ९ फेब्रुवारी पासून पुन्हा तापमानात वाढीस सुरुवात होईल अशी पुणे वेध शाळेतून शक्यता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button