Sportsक्रिकेटक्रीडा

आयपीएल 2021 च्या 61 जागांसाठी 292 खेळाडू, लिलावासाठी यादी जाहीर

IPL 2021 च्या हंगामासाठी १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण १११४ क्रिकेटपटूंनी नोंद केली होती. विविध देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून १८ फेब्रुवारीच्या लिलावासाठी २९२ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीत ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्याबरोबरच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या बोलीवरही साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. 

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. परंतु तरीदेखील अनेक मोठी नावं यंदा लिलावाच्या बाजारात असणार आहेत. खेळाडूंच्या मूळ किमतीनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक २ कोटी इतकी मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वूड या खेळाडूंचा समावेश आहे. दीड कोटी मूळ किंमत असणारे १२ तर १ कोटी मूळ किंमत असणारे

एक कोटी रुपयांची बेस प्राईस राखलेल्या खेळाडूंमध्ये भारताच्या हनुमा विहारी व उमेश यादवसह 11 खेळाडू आहेत. त्यात मॕथ्थ्यू वेड, बिली स्टॕनलेक, मार्नस लाबूशेन, मुस्तफिजूर रहमान, शेल्डन काॕट्रेल, आरोन फिंच, मोझेस हेन्रिक्स, जेसन बेहरेनडॉर्फ व एर्विन लुईस यांचा समावेश आहे.

75 लाखांची बेसप्राईस ठेवलेले सर्वच्या सर्व खेळाडू परदेशी आहेत तर 50 लाखाची बेसप्राईस ठेवलेल्या 75 खेळाडूंपैकी 13 भारतीय आहेत.

लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंमध्ये 164 भारतीय आणि 128 परदेशी खेळाडू आहेत. या 128 खेळाडूंमध्ये नेपाळचा संदीप लामीछान, अमेरिकेचा अली खान, युएईचा कार्तिक मरियप्पन हे कसोटी दर्जा न मिळालेल्या देशांचे खेळाडू आहेत. 176 खेळाडू हे पहिल्यांदाच आयापीएलसाठी खेळण्याच्या तयारीतील (अनकॕप) आहेत. 113 खेळाडू हे आधीच आयपीएल खेळलेले आहेत.

चेन्नईमध्ये हा लिलावाचा सोहळा पार पडणार आहे. दुपारी ३ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात होणार असून हा केवळ एकाच दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. या लिलावासाठी एकूण १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि ICCशी संलग्न असलेल्या देशाचे ३ असे एकूण २९२ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यंदाच्या लिलावासाठी पंजाबच्या संघाकडे सर्वाधिक ५३.२० कोटी रूपये शिल्लक आहेत, तर हैदराबाद आणि कोलकाता संघाकडे सर्वात कमी प्रत्येकी १०.७५ कोटी रूपये शिल्लक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button