पुणे
सिहंगड कॉलेज कॅम्पसची सीमा भिंत कोसळून ६ जण ठार, तर ५ गंभीर जखमी
पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे सोमवारी रात्री ११ : ३० च्या सुमारास सिंहगड कॉलेज कॅम्पसची सीमा भिंत बाजूच्या पाच घरांवर कोसळली. या अपघातात सहा जण ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जितू चंदन रवते (२४), राधेलाल पटेल (२५), जेटूलाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२), ममता पटेल (२४) अशी मृतांची नावे असून जखमींना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मान्सूनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात ठिकठिकाणी भिंत कोसळून मजुरांचे हकनाक बळी गेलेले आहेत. त्यामुळे बांधकाम मजुरांना कोणत्या परिस्थितीत राहावे लागते याचे भीषण वास्तव समोर येत आहे.

